शिरूर -आंबेगाव-शिरूर मतदारसंघात जिल्हा परिषद अंतर्गत व ग्रामीण जिल्हा रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
शिरूरमध्ये पिंपरखेड ते पारगाव रस्ता 1 कोटी 15 लाख रुपये, गणेगाव खालसा ते पद्मावती रस्ता 90लाख रुपये, जातेगाव ते प्रजिमा 90 लक्ष रुपये, दुडेवाडी ते शिंदेवाडी 40 लाख, चांडोह ते जांबूत 40 लाख, म्हसे बुद्रुक ते टाकळीहाजी 90 लाख, डोंगरगण ते टाकळीहाजी 50 लाख, पिंपरखेड ते आंबेवाडी 40 लाख, पाबळ येथील नऱ्हेबंद ते थापेवाडी 50 लाख, पाबळ ते फुटाणेवाडी 50 लाख;
तर आंबेगाव तालुक्यात पारगाव तर्फे खेड ते जरेवाडी 40 लाख, चांडोली बुद्रुक ते बेल्हा रस्ता 30 लाख, कळंब ते लौकी 35 लाख, कानसे पाचकेवाडी ते माळवाडी 40 लाख, अवसरी बुद्रुक प्रजिमा 18 ते खालचा थर, लाखणगाव ते कवठे रस्ता 30 लाख, भागडी ते शिंगवे हद्द 25 लाख, प्रजिमा 13 ते जाधववस्ती 30 लाख, वळती-शिंगवे रस्ता 30 लाख, पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे ते गावडेवाडी 40 लाख, जवळे गावठाण ते थापलिंग रस्ता 30 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.