कर्जत/जामखेड – कर्जत व जामखेड तालुक्यात विविध पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी आ. प्रा. राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला आणखीन एक यश मिळाले आहे. विविध विकासकामांसाठी ग्रामविकास विभागाने सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. आ. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून अनेक विकासकामे मार्गी लागत असल्याने जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार जामखेड तालुक्यातील शिऊर ते जाधववस्ती, मानेवस्ती रस्ता खडीकरण मजबुतीकरण (८ लाख रुपये), पोतेवाडी येथील लक्ष्मण सगळे घर ते काटेवस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे (१२ लाख), साकत येथील मुरुमकर वस्ती स्मशानभूमी सुशोभीकरण करणे (१० लाख), खुरदैठण येथील खंडोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे (१० लाख) ही कामे मंजुर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील खंडोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे (१० लाख),
नागमठाण येथील शिंदेवस्ती येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे (१० लाख), राक्षसवाडी बुद्रुक येथे बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे (१० लाख), बजरंगवाडी येथे बाळूमामा मंदिरासमोर सभामंडप बांधणे (१० लाख), चिंचोली काळदात येथे मोहटादेवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे (१० लाख), सौताडेवस्ती येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुशोभीकरण करणे (१० लाख) ही कामे मंजुर करण्यात आली आहेत.