फ्लोरिडा: हॉटेलमध्ये भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर हि सेवा पुरवणाऱ्या वेटरला टीप देण्याची प्रथा आहे. पण हि पतित कधीच बिलाच्या रकमेपेक्षा जास्त नसते. पण फ्लोरिडातील एका भारतीय हॉटेलमधील सर्वरला म्हणजेच वेटरला बिलाच्या रकमेच्या दहापट म्हणजेच २०२० डॉलर्सची टीप मिळाली भारतीय रुपयांमध्ये हि रक्कम १ लाख ६० हजार रुपये होते.
मसाला मंत्रा इंडियन बिस्ट असे या भारतीय हॉटेलचे नाव असून या हॉटेलमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भोजनासाठी आलेल्या एका कुटुंबाचे बिल २६९ डॉलर्स झाले होते पण या बिलावर त्यांनी तब्बल २०२० डॉलर्सची टीप दिली. अमेरिकेत सध्या टाईप चॅलेंज नावाचा प्रकार लोकप्रिय असून त्याचाच हा भाग असल्याचे मानले जाते २०२० या सरत्या वर्षाच्या निमित्ताने या ग्राहकाने २०२० डॉलर्सची टीप दिली अशीही शक्यता आहे.
या भारतीय हॉटेलने त्वरित हि घटना सोशल मीडियावर वायरल करून या दानशूर ग्राहकाचे आभार मानले अशा प्रकारच्या ग्राहकांमुळेच आम्हाला चांगली सेवा देण्यास प्रोत्साहन मिळते. असे हॉटेलच्या व्यवस्थापनाने म्हणले आहे.
करोना महामारीच्या संकटामुळे अमेरिकेतील हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. आता कोठे पुन्हा एकदा व्यवसाय सुरु झाल्यानंतर हॉटेल चालकांना अर्थिक मदत आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्राहक जास्त टीप देत आहेत.