सातारा – जिल्ह्यात गुरुवार (दि. 12) रात्री जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार आणखी 149 नागरिकांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात करोनाबाधितांचे प्रमाण घटत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील करोनाची भीती बऱ्याच अंशी कमी झाल्याने दीपावलीनिमित्त खरेदीसाठी गर्दी होत आहे. करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्णपणे थांबलेले नाही. त्यातच कोविड-19 ची दुसरी लाट येईल, असा धोक्याचा इशारा देशातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहेत. मात्र, नागरिकांचे “सवयभान’ सुटत चालले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांची अंमलबजवणी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात यादोगोपाळ पेठ, राजसपुरा पेठ प्रत्येकी दोन, रविवार पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र दोन, शिंदेघर 14, करंजे पाच, शाहूपुरी चार, मोळाचा ओढा तीन, विकासनगर दोन, गोडोली, विलासपूर, क्षेत्र माहुली, आसनगाव, देगाव, वडगाव, बोते, मुळीकवाडी, पळशी, वेळेकामथी, जिहे, दरे खुर्द, वेण्णानगर, कृष्णानगर, गोजेगाव प्रत्येकी एक, कराड तालुक्यात कराड चार, आगाशिवनगर, सुपने प्रत्येकी दोन, इंदोली, बेलवडे प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात बदेवाडी दोन, हेळगाव,दिवशी, धामणी प्रत्येकी एक
फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरात नरसोबानगर, मलठण, ब्राह्मण गल्ली प्रत्येकी एक, सुरवडी दोन, खुंटे, जाधववाडी, उपळे, आसू, होळ, शेरेचीवाडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात वडूज सहा, पुसेगाव पाच, वेटणे, मायणी प्रत्येकी दोन, खटाव, लांडेवाडी, पिंपरी, बुध, सिंहगडवाडी, भुरकवडी प्रत्येकी एक, माण तालुक्यात म्हसवड तीन, बिदाल, वडगाव, राणंद प्रत्येकी दोन, कुकुडवाड, निढळ प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर 11, चिलेवाडी, कोरेगाव प्रत्येकी दोन, वर्णे, लक्ष्मीनगर प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात मेढा, बामणोली प्रत्येकी एक, वाई तालुक्यामध्ये वाई शहरात धर्मपुरी दोन, नव्याचीवाडी, रविवार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र एक, वेळे दोन, सुरुर, पाचवड, व्याजवाडी, बावधन प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात शिरवळ, लोणंद प्रत्येकी एक, इतर दोन, बाहेरील जिल्ह्यांमधील पुणे तीन, असे एकूण 149 अहवाल बाधित आले आहेत. बाधितांची एकूण संख्या 48 हजार 620 झाली आहे.