वाघोली- वाघोली ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र सातव यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर शिरूर-हवेलीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश पार पडला. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या उपस्थितीत मच्छिंद्र सातव यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. आढळराव पाटील व कटके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मच्छिंद्र सातव यांनी सांगितले.