वाघोली- पुणे जिल्हा, शहर व धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे मुळा- मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असल्याने मांजरीचा पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. शनिवारी (दि.3) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पुलावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला. पुलावर दिवसभर पाणी असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
यावेळी नदीचे पाणी मांजरी खुर्दच्या स्मशानभूमिपर्यंत आले आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.