चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विषयी आक्षेपार्ह उद्गार काढल्याच्या आरोपावरून तमिळ विचारवंत आणि वक्ते नेल्लई कन्नन यांच्यावर गुन्हा दाखल केला. भारतीय जनता पक्षाने त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
सुधारीत नागरिकत्व कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिकत्व सुची (एनआरसी) यांच्या विरोधातलि निदर्शनावेळी कन्नन म्हणाले, जर अमित शहा संपले तर मोदी संपतील. पण तुमच्यापैकी कोणीही त्यांना संपवणार नाही. तुम्ही काही कराल अशी मला आशा होती. मी दिल्लीत याबाबत अनेक जणांशी बोललो. पण कोणी काही करणार नाही.
अमित शहा हाच गुन्हेगार आहे. मोदी जरी पंतप्रधान असले तरी तरी त्यांच्यामागे अमित शहाचा मेंदू आहे, असेही ते म्हणाले होते. पोलिस कन्नन यांना अटक करण्यासाठी घरी गेले. त्यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
समाजमाध्यमांत या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर आधारीत पोलिस फिर्याद करण्यात आली. त्यांतरच पक्षाचे सरचिटणीस केएस नारायण यांनी पोलिस महासंचालकांकडे कडक कारवाई करण्याची स्वतंत्र मागणी केली.