नवी दिल्ली : महसूल गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक चंदर शेखर आणि एका मध्यस्थाला 25 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात सीबीआयने अटक केली.
या महाघोटाळ्याच्या तपासासाठी नवी दिल्ली, नोएडा आणि लुधियानात अनेक ठिकाणी छापे टाकले. चंदर शेखर यांची नियुक्ती लुधियानात होती. शेखर यांच्या वतीने लाच घेणाऱ्या एका मध्यस्थालाही अटक करण्यात आली. त्याला अटक केल्यावर त्याने हे पैसे अपण शेखर यांच्या स्वीकारत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनाही अटक केली.
दरम्यान, लाचेची ही रक्कम एका मोठ्या व्यवहारातील एक लहानसा भाग असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास करण्यात आला आहे.