पुरग्रस्तांना “सोनाई’द्वारे दिला मदतीचा हात
नीरा नरसिंहपूर- भीमा व नीरा नदीचा संगम असलेल्या नीरा नरसिंहपूर येथे पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासही झगडावे लागत आहे, यामुळे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती यांनी पुरग्रस्तांच्या मदतीला धाव घेत. दूध तसेच जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.
भीमा व नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नीरा नरसिंहपूर येथील रहिवासीयांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असले तरी दैनंदिन वापराच्या वस्तु मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे सुरवातीला पाहणी केल्यानंतर सभापती माने यांनी गुरूवारी (दि.8) येथे दूध, गुळ यासह दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप केले. सोनाई परिवाराच्यावतीने सोनाई गुळ व मसाला दुधाचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी सभापती प्रविण माने यांच्यासह इंदापूर मार्केट कमिटीचे संचालक सचीन देवकर, आण्णासाहेब काळे, कमलेश डिंबरे, अभय बांगकर, दशरथ राऊत, अमोल मोहिते, नारायण दंडवते, आनंद काकडे, पिंटू माळवारे, श्रीकांत दंडवते, नरहरी काळे, सुनील पालवे, शंकर राऊत, गौरव दंडवते, साधू नरुटे, हरिभाऊ पवार, सोमनाथ मोहिते, गणेश मोहिते, आदी उपस्थित होते.