निमसाखर -येथील अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी भारत मुक्ती मोर्चा, युनिट निळं वादळ यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जंक्शन पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. निमसाखर गावात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री होत असून ही दारू विक्री बंद करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन नुकतेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.सदर गावातील अवैध दारु व्यवसाय बंद न झाल्यास या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भारत मुक्ती मोर्चा, निळं वादळ ग्रुप यांच्या वतीने देण्यात आला आहे.