पिंपरी – दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरटयांनी घरातील 39 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 26) सकाळी चिखली येथे उघडकीस आली.
कल्पेश सुरेश अनफळकर (वय 29, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कल्पेश हे 23 ते 26 जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आतील सोन्या-चांदीचे दागिने आणि 10 लाखांची रोकड असा एकूण 39 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.