बगदाद : इराणचा पाठींबा असणाऱ्या दहशतवाद्यांच्या इराक आणि सिरीयातील तळावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात 25 जण मरण पावले, असे या दहशतवादी गटातील नेत्यांनी सांगितले. अमेरिकेच्या या कृतीचा बदला घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क इस्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन कंत्राटदाराची इराकमध्ये हत्या करण्यात आली. त्याचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आली. इराक आणि सिरीयातील पाच ठिकाणी हे हल्ले करण्यात आले.
दरम्यान, अमेरिकेबरोबर आमच्या युध्दाला या मुळे वेगळा रंग चढेल. आम्हाला आमचे सर्व पर्याय खुले आहेत, असे कतिब हझबोल यांनी निवेदनात म्हटले आहे. अमेरिकन कंत्राटदाराचा मृत्यू झाला त्याच्यावर तीस रॉकेटचा मारा करण्यात आला होता. त्यावे रविवारी अमेरिकेने उत्तर दिले. त्यात मृतांची संख्या 25 वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.