भोपाळ : नेमबाज विजयवीर सिध्दू याने रविवारी ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी अंजिक्यपद स्पर्धेत पुरूषाच्या २५ मी स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात व्यक्तिगत सुवर्णपदक पटकावले. विजयवीरने ५८० गुणांसह पहिले स्थान पटकावले. तर गुरप्रीत सिंह ५७८ गुणांसह दुस-या आणि उदयवीर सिध्दू ५७४ गुणांसह तिस-या स्थानी राहिले.
ज्यूनियर गटातही विजयवीरने ५८० गुणांसह प्रथम स्थान पटकावत सुवर्ण पटकावलं, तर उद्यवीरने ५७४ गुणांसह दुसरे आणि हर्ष गुप्ताने ५७२ गुणांसह तिसरे स्थान प्राप्त केलं.
विजयवीर याने उद्यवीर आणि उनीश होलिंदर यांच्यासोबत मिळून १६९९ गुणांसह ज्यूनियर गटात सांघिक सुवर्णपदक मिळवले. तर गुरप्रीत, नीरज कुमार आणि गुरमीत यांनी सिनियर गटात सांघिक कामगिरी करताना २५ मीटर स्टँटर्ड पिस्तूल प्रकारात १७०७ गुणांसह पहिले स्थान पटकावत सुवर्णपदक प्राप्त केल. पुरूषांच्या ५० मी पिस्तूल प्रकारात बीएसएफच्या शिव कुमार घोषने सुवर्णपदक प्राप्त केलं.