वाघोली- टीव्ही न्यूज चॅनेलच्या बातम्यांचा फोटो काढून त्यामध्ये वाघोलीत करोनाचे रुग्ण आढळल्याचा मजकूर टाकून अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिला आहे. दरम्यान, वाघोलीत करोनाचा रुग्ण आढळला नसतानाही अशाप्रकारचे खोटे वृत्त पसरविले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याने नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून क रण्यात आले आहे.
वाघोली येथील रायसोनी कॉलेजच्या दोघांना करोनाची लागण झाल्याचा मेसेज व टीव्ही चॅनेलचा बदल केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मजकुरामुळे वाघोली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. टीव्ही चॅनेलच्या बातम्यांचा फोटो काढून त्यामध्ये वाघोलीत करोनाचे दोन रुग्ण आढळल्याचा मजकूर टाकण्यात आला आहे. बातमीमध्ये अदलाबदल करून त्याचा फोटो सोशल मीडियावर पसरविला जात असल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. समाजभान ठेवून अशाप्रकारे चुकीचे संदेश पाठवू नये, चुकीच्या अफवा पासरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिला आहे.
- वाघोलीतील डॉक्टरांना मार्गदर्शन
करोनापासून बचाव करण्यासाठी वाघोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्र आवश्यक काळजी घेत आहे. यासंबंधी वाघोली डॉक्टर्स असो सिएअशनचे पदाधिकारी व खासगी डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. करोनाशी संबंधित लक्षणांची मा हिती देऊन शंका वाटल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. डॉक्टरांनी करोनाशी लढण्यासाठी एकत्र काम क रण्याचे आश्वासन दिले. - परदेशातून आलेल्यांची माहिती कळवा
परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये करोनाचे रुग्ण सर्वाधिक असल्याने वाघोली परिसरात परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती प्राथ मिक आरोग्य केंद्रामध्ये कळवावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नसली तरी देखील आरोग्य विभाग त्यांची तपासणी करून 14 दिवस लक्ष ठेवणार आहे. जेणेकरून पुढील प्रादुर्भाव वाढणार नाही. - रायसोनी कॉलेजमध्ये करोनाचा रुग्ण आढलेला नाही. बातम्यांमध्ये बदल करून रायसोनीत करोनाचे रुग्ण आढळल्याचा फोटो प्रसारित करून खोडसाळपणा केला जात आहे.
– अजित टाटीया, संचालक रायसोनी कॉलेज