गुनाट येथे डॉ. कोल्हेंची बैलगाडीतून मिरवणूक
गुनाट – ज्यांनी पाच वर्षांत तरूण, शेतकरी, बेरोजगार यासह देशातील सर्व घटकांसाठी काहीच केले नाही. ते आता भावनिक मुद्द्यांना हात घालून हुकुमशाहीचा डाव रचत आहेत. त्यांचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येत देशाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला भक्कम साथ देताना घड्याळाला मत द्या, असे आवाहन शिरूर-हवेलीचे माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यात डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ गावभेटी दौरा झाला. यावेळी गुनाटसह परिसरात झालेल्या झंझावती दौऱ्यात पवार बोलत होते. दरम्यान, ग्रामस्थांनी डॉ. अमोल कोल्हे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, राजेंद्र जगदाळे, सभापती विश्वास कोहकडे, तालकुा राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवी काळे, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, संचालक दिलीप मोकाशी, जिल्हा बॅंकेच्या संचालिका वर्षा शिवले, बाबासाहेब फराटे, खरेदी विक्री संघाचे संचालक निळुभाऊ टेमगिरे, भाऊसाहेब आसवले, सरपंच दिप्ती कर्पे, सभापती बाजीराव कोळपे, गणेश कर्पे, गहिणीनाथ डोंगरे, सचिन कर्पे, सतीश कोळपे, भिवसेन कोळपे, रंगनाथ भोरडे, संभाजी गाडे, संतोष फंड आदी मान्यवर उपस्थित होते.
अशोक पवार म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघात आता परिवर्तनाचे वारे वाहत असून डॉ. कोल्हे यांना लहान, थोर, माता, भगिनी आणि विशेष करून युवावर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. खासदार आढळराव यांनी गेल्या 15 वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने या भागातील मतदारांमध्ये नाराजी असल्याने शिरूर-हवेलीच्या विकासासाठी यावेळी महाआघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांना भक्कम साथ देत बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन पवार यांनी केले.
व्हिजन डॉक्युमेंट तयार
माझ्याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या भोगोलिक, ऐतिहासिक, पर्यटन असो किंवा सर्वच क्षेत्राचे वास्तववादी व्हिजन डॉक्युमेंट तयार आहे. मी जे करणार आहे, तेच बोलणार आहे. खोटी स्वप्ने दाखवून दिशाभूल कदापी करणार नाही, असे आश्वासन डॉ. अमोल कोल्हे यांनी देताच त्याला उपस्थितांनी दाद देत यंदा परिवर्तनाचा नारा दिला.