शारदानगरची स्नेहल आयएस परीक्षेत उत्तीर्ण

शारदानगर- बारामती येथील ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये 2008 ते 2013 पर्यंत इयत्ता 8 वी ते 12 वीचे शिक्षण शारदानगर येथील शैक्षणिक संकुलात व ग्रामीण भागात राहणारी स्नेहल नानासाहेब धायगुडे हिची भारतीय प्रशासकीय सेवेच्या आयएस परीक्षेत झाली आहे. तिची 108 रॅंकने निवड झाल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संस्थेचे सी.इ.ओ.निलेश नलावडे व दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजनांच्या उपस्थितीत तिचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी स्नेहल विद्यार्थ्यांना उदेशून म्हणाली की, शालेय वयात अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व इतर उपक्रमातही सहभागी व्हा. शिक्षक व आई-वडील आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक आहेत, त्यांचे ऐका स्वतःमधील चांगले गुण ओळखा. जे काही ठरवलय ते मनापासून करा. जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता.शारदानगरमध्ये शिकत असताना अभ्यासाबरोबर सुप्त कलागुणांना वाव मिळाला वसतिगृहात रहाण्याची संधी मिळाली, त्यामुळे तेथील समृद्ध ग्रंथालय मान्यवरांच्या भेटी, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण, परिवर्तन व्याख्यानमाला यामुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीची बीजे येथेच रुजली व व्यक्तिमत्व विकास झाला. माझ्या यशस्वी वाटचालीत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, संस्थेच्या शिक्षण विभाग प्रमुख सुनंदा पवार, सीइओ निलेश नलावडे आणि शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. दहावीपर्यंतचे सर्व शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले.परंतु इंग्रजीसह सर्व विषयांचा पाया पक्का झाला. शारदानगरमध्ये आल्यानंतर विविध स्पर्धामधील सहभाग व सुनंदाताईच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडला त्यामुळे प्रभावित होऊन आयुष्यातील उल्लेखनिय कार्य करण्याचे ठरवले, असे तिने नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.