थेनी: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरले आहेत. थेनी येथील सभेत नरेंद्र मोदी विरोधी पक्षांवर कडाडून टीका करत आहेत. त्यांनी माजी अर्थ मंत्री पी चिदंबरम यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
नरेंद्र मोदी म्हणाले, पी चिदंबरम आणि त्यांच्या मुलाने देशाला लुटले आहे. जेव्हा ते सत्तेत येतील देश लुटतील. तसेच एयरसेल-मैक्सिस डील मध्ये कार्ति चिदंबरम भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करत आहेत, असे मोदी म्हणाले.
तसेच भारताची जगात होत असलेली प्रगती द्रमुक, कांग्रेस आणि त्यांचे महामिलावटी मित्र यांना सहन होत नाही आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचे मोदी म्हणाले.