पुणे – सध्या देशासह महाराष्ट्रात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचारांची रणधुमाळी आहे. आपला पक्षाचा उमेदवार जिंकून यावा, यासाठी पक्षाच्या उमेदवारासह, पक्षातील नेतेमंडळी, कार्यकर्ते गावोगावी जाऊन मतदारापर्यंत पोहचून प्रचार करताना दिसत आहेत.
अशातच , शनिवारी सकाळी रामनवमीनिमित्त भोर तालुक्यातील बांडेवाडी या गावातील यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि भाजपचे स्टार प्रचारक चंद्रकांत पाटील यांची समोरासमोर भेट झाली.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांनी एमकमेकांना हसतमुखानं नमस्कार केला आणि दोघेही आपापल्या रस्त्यानं प्रचारासाठी रवाना झाले.
यंदाच्या लोकसभा निवडणूकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या उमेदवार कांचन कूल असा सामना रंगणार आहे. याविषयी बोलताना ‘यंदा बारामतीत इतिहास घडणार’ असं भाकीत चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलंय.
तसेच मागील निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि महादेव जानकार यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळायला होती, यामध्ये सुप्रिया सुळेंनी विजय मिळविला होता. त्यामुळे दोन्ही पक्षाचे उमेदवार आणि नेते विजयासाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहे.