राज ठाकरेंच्या सभांचा सेना-भाजपवर परिणाम नाहीच

मुंबई – देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून या 48 लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मतमोजणीच्या सुरवातीला सेना-भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, राज्यातील प्रचारादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.
निवडणूक काळात राज यांनी सत्ताधारी सेना- भाजपवर चांगलीच सडकून टीका केली होती. नुसतीच टीका केली नसून, राज यांनी सत्ताधाऱ्यांवर जे आरोप केले होते. ते व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यानिशी सादर देखील केले होते. राज यांनी घेतलेल्या सभांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना होईल असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. परंतु राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या त्यापैकी काही उमेदवार पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा कांग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.