पुण्यात गिरीश बापट विजयी !

पुणे:पुण्यात गिरीश बापट यांनी काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांचा पराभव केला आहे. “हा विजय एका व्यक्तीचा विजय नाही तर तो सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे. हवामानावर अवलंबून असलेल्या कामाचा विजय नसून पक्षाने केलेल्या कामाची पावती आहे. गेली अनेक वर्षे पुण्याच्या ज्या विकासाची स्वप्न आम्ही पाहत होतो ती साकार करण्याची वेळ आता आली असल्याचे म्हणाले.

बापटांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीका केली, बारामतीत दिलेला कौल आम्ही स्वीकारतो मात्र, मावळमध्ये पार्थ पवारांचा पराभव हा घराणेशाहीचा, मक्तेदारीचा मतदारांनी केलेला पराभव आहे. पुण्यातील विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच शहारतील सर्व खासदार आमदार पदाधिकारी विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते या सर्वाचा हा विजय आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here