मुस्लिम पर्सनल लॉ बोडाच्या फेरविचार याचिकेला अयोध्यतील तीन पक्षकारांचा पाठींबा

अयोध्या : अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत फेरविचार याचिका दाखल करण्याचा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने घेतला. त्याला अयोध्यतील तीन पक्षकारांनी पाठींबा दिला आहे.

बोर्डाच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार फेविचार याचिका दाखल करण्याची घोषणा जमात उलेमा हिंद यांनी दाखल केली. त्यांना अयोध्या आणि फैझपूर येथीलमहंमद उमर, मिसबहुद्दीन यांनी पाठींबा दिला.

तर तांडा येथील मौलाना महफूज उर रहमान यांनीही पाठींबा दिला. त्यापुर्वी हाजी मेहबूब, हाजी असद, अफिज रिझवान आणि मौलाना हिजबुल्ला यांनी बोर्डाने दाखल करावयाच्या फेरविचार याचिकेस पाठींबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पाठींबा देणाऱ्यांची संख्या सातवर पोहोचली आहे.

आयोध्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णयाला माझी संमती मी बोर्डाला कळवली आहे, असे हाजी मेहबूब यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, बोर्डातून निलंबित करण्यात आलेले मौलाना सलमान नादवी यांनी फेरविचार याचिका दाखल करण्याची आवश्‍यकता नसल्याचे सांगितले. फेरविचार याचिका दाखल करण्याचा घटनात्नक हक्क आम्ही बजावू आणि न्यायलयीन लढाई लढू, असे हाजी असद म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.