शिक्षकांचे रिक्त पदे भरली जाणार; पगारात देखील भरमसाठ वाढ

नवी दिल्ली: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात, मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यूपी सरकारमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांसाठी चांगली बातमी आहे. यूपी सरकारने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी मोठे पाऊल उचलले असून 13 राज्य वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 542 रिक्त पदे भरली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

यासह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी शिक्षकांच्या वेतनश्रेणीत वाढीस मान्यता देण्यात आली आहे. प्राध्यापकांचा पगार 90 हजार वरून 1 लाख 35 हजार, सहयोगी प्राध्यापकाचा पगार 80 हजार वरून 1 लाख 20 हजार, सहाय्यक प्राध्यापकाचा पगार 60 हजार वरून 90 हजार व व्याख्यातांचा पगार 50 हजार वरून 75 हजार करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.