मुंबईत 90 लाखांची रोकड सापडली

मुंबई – दक्षिण मुंबईतील दोन घटनांमध्ये 90 लाख रूपयांची रोकड सापडली आहे. निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या वाहनांच्या तपासणीत ही रोकड आढळून आली आहे. दोन दिवसांपुर्वी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुष कावेडिया नावाच्या इसमाकडून 40 लाखांची रोकड हस्तगत केली तर दुसऱ्या एका घटनेत पारसी अग्यारी जवळ एका लालरंगाच्या गाडीतून 50 लाखांची रोकड आढळून आली आहे. ती सारी रक्कम जप्त करण्यात आली आहे.

या दोन्ही प्रकारांची माहिती दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवण्यात आली आहे. या नोटा या मतदार संघाच्या हद्दीतच जप्त करण्यात आल्या आहेत. या मतदार संघात कॉंग्रेसचे मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात लढत होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.