थरूर यांच्याकडून अपघाताच्या चौकशीची मागणी
नवी दिल्ली -संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तर थरूर यांनी अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
केरळातील तिरुवअनंतपुरम येथे एका मंदिरात पूजा करताना शशी थरूर यांचा सोमवारी अपघात झाला. त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निर्मला सीतारमन यांनी भेट घेतल्याची माहिती शशी थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. व त्यांचे आभार मानले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असतानाही निर्मला सीतारमन यांनी रुग्णालयात येऊन माझी भेट घेतली. त्याबद्दल मला मनापासून बरे वाटले. भारतीय राजकारणातील सभ्यता एक दुर्मीळ गुण आहे, असे शशी थरूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.