पुणे – राडारोडा निर्मूलनासाठी पालिकेची स्वतंत्र यंत्रणा

राडारोडा संकलन केंद्रे तयार करणार

पुणे – बांधकाम, दुरुस्ती, विविध प्रकारची खोदाईची कामे यामुळे निर्माण होणाऱ्या राडारोड्याचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. त्यासाठी विविध ठिकाणी राडारोडा संकलन केंद्रे तयार करण्यात येणार आहेत.

महापालिकेचे विविध विभाग, एमएनजीएल, टेलिफोन कंपन्या, खासगी विकसक यांच्यामार्फत करण्यात येणारे बांधकाम, दुरुस्ती, विविध प्रकारची खोदाईमुळे मोठ्या प्रमाणात राडारोडा निर्माण होतो. निर्माण होणारा राडारोडा कुठे टाकावा, यासाठी पर्याय नसल्याने नागरिकांकडून तो ओढे, नाले, नदीकिनारी आणि मोकळ्या जागांवर टाकला जातो. या सर्व प्रकारच्या राडारोड्याचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे नियोजन केले आहे.

यात राडारोडा वाहतूक करणे, राडारोड्यावर प्रक्रिया करणे, राडारोडा ठेवण्यासाठी जागा निश्‍चित करणे, संकलन करण्यात आलेला राडारोडा आवश्‍यकतेनुसार भूभरावासाठी आणि खाणीचा भाग समतल करण्यासाठी वापरणे आदींचा समावेश आहे. महापालिका हद्दीतून राडारोडा संकलीत करून त्याच्या वाहतुकीसाठी 19 रुपये प्रति मे.टन प्रति कि.मी. दर निश्‍चित केला आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे अंतराचे मोजमाप केले जाणार आहे.

येथे करा संपर्क
1800-233-9595 राडारोडा उचलण्यासाठी टोल फ्री क्रमांक

पालिका घेणार दक्षता
निर्माण होणारा राडारोडा नदीपात्र, नाले, रस्ते यांच्या कडेला टाकला जाणार नाही, याची दक्षता महापालिकेकडून घेण्यात येणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×