पदयात्रांवर अजय शिंदेचा भर

पुणे  : कसबा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अजय शिंदे यांच्याकडून मतदारांच्या भेटीसाठी पदयात्रांवर भर दिला जात आहे. या पदयात्रांना चांगला प्रतिसाद मिळत असून मतदारांकडूनही शिंदे यांचे जोरदार स्वागत करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या प्रचारासाठी उद्या ( सोमवारी) कसबा विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता महात्मा फुले मंडई येथे ही सभा होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
रविवारी शिंदे यांच्या प्रचारार्थ सिंहगड गॅरेज चौक, पंचहौद मिशन , शीतळा देवी चौक, कृष्णा हट्टी चौक, मिर्झा मशीद, इंकलाब फ्रेंडस सर्कल, राजा टावर, काची आळी, अहिल्यादेवी मंदिर, रजाशहा हॉल, गौरी आळी चौक, गंज पेठ पोलिस चौकी, जिवेश्वर सभागृह, छोटी मशीद, मोमीनपुरा, मक्का मशीद, दलाल चौक, बोंबिल वाडा, अलसबा चौक, मदणी सोसायटी, दलाल चौक, यू.पी बेकरी, गोल्डन हॉटेल, घोरपडे पेठ पोलिस चौकी, खडकमाळ या भागात प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ देण्याचे भावनिक आवाहनही केले. या पदयात्रेत मोठया संख्येने युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)