इंदापूरचा आमदार भरणेंकडून कायापालट

वैशाली पाटील : वालचंदनगर-कळंब परिसरातील मतदारांशी साधला संवाद

रेडा- मागील 20 वर्षे इंदापूर तालुका हा विकासासाठी आसुसलेला होता;परंतु आमदार दत्तात्रय भरणे यांनी शासनाच्या माध्यमातून तब्बल 1400 कोटींचा निधी विकासकामांसाठी खेचून आणल्यामुळे प्रत्येक भागाचा कायापालट सुरू आहे. उर्वरित राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला मत द्या, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली पाटील यांनी केले.

वालचंदनगर-कळंब परिसरातील मतदारांच्या घरभेटी, तसेच पदयात्रा वैशाली पाटील यांनी शेकडो महिलांच्या उपस्थितीत काढली, त्यावेळी पाटील बोलत होत्या. रणगाव, जंक्‍शन, आनंदघन परिसरातील मतदारांशी संवाद साधला. यावेळी पंचायत समितीच्या सदस्य शैलजा फरतडे, सारिका लोंढे, प्रतिमा भरणे, कुसुम धापटे, वैशाली मिसाळ, ज्योती खरात, रेणुका जाडकर, लता उबाळे, यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या

वैशाली पाटील म्हणाल्या की, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्‍यातील अपेक्षित कामे मार्गी लागली आहेत. तर ग्रामीण भागातील रस्ते,अद्यावत गटारी,प्राथमिक शाळेची बांधकामे,आरोग्य सेवा पुरवणाऱ्या इमारती,अशी शेकडो विकास कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत याचे सर्व श्रेय राष्ट्रवादीला असल्याने आमदार भरणेंना सर्वाधिक मताधिक्‍य द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.