निक्रिय आमदारांना घरी बसवा

हर्षवर्धन पाटील यांचे मतदारांना आवाहन : लोणी देवक, भावडीत प्रचारसभा

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील जनतेच्या हिताचा एकही प्रश्‍न विद्यमान आमदारांनी मार्गी लावला नाही. त्यामुळे तालुक्‍यातील शेती ओसाड पडली आहे. युवकांचे महिलांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी काम न करणाऱ्या आमदारांना कायमचे घरी बसवा, असे आवाहन भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांची प्रचारसभा लोणी देवकर, भावडी येथे पार पडली, त्यावेळी उमेदवार हर्षवर्धन पाटील बोलत होतेत यावेळी ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, कालिदास देवकर, निलेश देवकर, भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, दूधगंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नितीन कदम, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संदीप कडवळे, पिंटू काळे, भूषण काळे, श्रीकांत देवकर, विकास देवकर, अर्पण डोंगरे, रामसूरत तोंडे, मंगेश डोंगरे, जयवंत सूर्यवंशी, संग्रामसिंह देशमुख, सोजरबाई सूर्यवंशी, तुकाराम मोठे, पोपट उचाळे, शिवाजी काळे, रमेश शेलार, देविदास मदने, संजय देवकर, सुनील साळवे, भगवान पांढरे, चंद्रकांत वीर, प्रवीण मदने, अनिल गलांडे, बाप्पा अवघडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भावडी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, बॅकवॉटर परिसरातील काही गावांतील शेतकऱ्यांच्या अडीच हजार हेक्‍टर शेती वर उगीच खडकवासला विभागाचा शेरा पडला असल्याने, शेतकऱ्यांना कोणतेही कर्ज काढता येत नाही व खरेदी-विक्री करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे मी आमदार झाल्यावर पहिल्यांदा अडीच हजार हेक्‍टर शेतीवरील असणारा खडकवासला विभागाचा शेरा उडवणार, असल्याची ग्वाही त्यांनी दिली. लोणी देवकर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी राजाश्रय महत्त्वाचा आहे. भाजपचे सरकारच अशा विकासात्मक गोष्टीकडे लक्ष देऊ शकते, म्हणून भाजपच्या मागे मतदानातून उभे राहणे गरजेचे असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

  • देवकर लोणी एमआयडीसीतील प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहेत. ते कोणामुळे आहेत? पाच वर्षांत विधानभवनात आपण कुठेही भांडला नाही. भाजप शिवसेनेमध्ये जातीवादाला थारा दिला जात नाही. इंदापूर तालुका सुजलाम्‌ सुफलाम होण्यासाठी प्रत्येक तरुणांनी भगवा झेंडा हाती घेऊन विधानसभेची निवडणूक हातात घेतली पाहिजे.
    – ऍड. नितीन कदम, माजीप्रमुख, इंदापूर तालुका, शिवसेना
  • भाजपच्या मागे खंबीरपणे उभे राहा – शेंडे
    भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशात व राज्यात विकासाचा विकासकामांचा धडाका सुरू असल्याने चेहरामोहरा बदलला आहे त्यामुळे इंदापूर तालुक्‍याचा चेहरामोहरा विकासात्मक बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीर उभे रहावे, असे आव्हान भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी केले.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)