ताहिर हुसैनविरोधात “ईडी’कडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतून निलंबित करण्यात आलेला समन्वयक ताहिर हुसैन याच्यासह “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि अन्य काही जणांविरोधात सक्‍त वसुली संचलनालयाने मनी लॉन्डरिंग आणि गेल्या महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला कथित अर्थसहाय्य केल्याबद्दल बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

ताहिर हुसैनवर यापूर्वीच गुप्तचर अधिकाऱ्याची हत्या, दंगल माजवणे आणि “मनी लॉन्डरिंग’विरोधी कायद्याखाली गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. असेच आरोप “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वरही लावले गेले आहेत.

देशाच्या विविध भागांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात आंदोलन भडकावण्याच्या आरोपाखाली या संघटनेविरोधात यापूर्वीच “पीएमएलए’ची चौकशी सुरू आहे. या संदर्भात “पीएफआय’कडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

या प्रकरणात हुसेनची चौकशी करण्यासाठी “ईडी’ त्याला ताब्यात घेण्याची अपेक्षा आहे. सध्या तो दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. हुसेन, पीएफआय आणि इतरांनी जातीय दंगलीला चिथावणी देण्यासाठी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या “एफआयआर’ची दखल “ईडी’ने घेतली आहे.

दिल्लीतील मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातील “आप’चा नगरसेवक असलेल्या हुसैनवर दंगलीदरम्यान गुप्तचर अधिकारी अंकित शर्माच्या हत्येचाही गुन्हा दाखल आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.