तहसीलदारांच्या बदल्या

पुणे – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर एकाच जिल्ह्यात 3 वर्षांपेक्षा अधिककाळ कार्यरत असलेल्या तहसीलदारांच्या बदल्या राज्य शासनाकडून करण्यात आल्या. यामध्ये पुणे विभागातील 30 तहसीलदारांचा समावेश आहे.

पुरंदरच्या तहसीलदारपदी रुपाली सरनोबत, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारपदी रोहिणी आखाडे, आंबेगाव तहसीलदारपदी रमा जोशी तर दौंडच्या तहसिलदारपदी संजय पाटील यांची नियुक्‍ती झाली आहे.

मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांची मिरज तहसीलदारपदी, दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांची बदली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात, शिरूरचे तहसीलदार गुरु बिराजदार यांची शाहुवाडी तहसीलदारपदी नियुक्‍ती झाली आहे.

तहसीलदारांचे नाव (नेमणुकीचे ठिकाण)
सुषमा पाटील (तहसीलदार महाबळेश्‍वर), सुशील बेल्हेकर (तहसीलदार एसआरए पुणे), सोनिया घुगे (तहसीलदार एसआरए पुणे), मधुसूदन बर्गे (तहसीलदार मावळ), दिनेश पारगे (तहसीलदार गडहिग्लज), शैलजा पाटील (तहसीलदार कडेगाव), ऋषिकेश शेळके (तहसीलदार विटा).

Leave A Reply

Your email address will not be published.