बस पुरवठ्यास उशीर; उत्पादक कंपन्या गोत्यात

पुणे – पीएमपीच्या ताफ्यात ऑक्‍टोबरअखेरीस पर्यावरणपूरक 225 सीएनजी बस व 75 ई-बस दाखल होणार आहेत. परंतु, त्या आणण्यासाठी उशीर केल्याने उत्पादक कंपनीला प्रतिबस 10 हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद असून त्या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

प्रदूषणविरहित 150 बस पीएमपीने भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत. त्यामधील 75 बस दाखल झाल्या असून 75 बस यायच्या आहेत. तसेच सीएनजीवर धावणाऱ्या 400 बस घेतल्या असून आतापर्यंत 175 बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून 225 बस लवकरच येणार आहेत.

संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत ऑक्‍टोबरअखेर बस मार्गावर धावण्याविषयी कंपनीलाही सूचना करण्यात आल्या. यातील 300 बस 12 मीटर लांबीच्या असून पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरातील बीआरटी मार्गावर धावणार आहेत.

साडेचार कोटी रु. दंड
सीएनजी व ई-बस ऑगस्टमध्ये पीएमपीच्या ताफ्यात दाखल करण्याबाबत कंपनीशी करार करण्यात आला होता. मात्र, उत्पादित कंपनीने बस आणण्यास उशीर केल्याने त्यांना सुमारे 4.5 कोटी दंड आकारण्यात आला आहे. त्यानुसार, संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)