सहारनपूर – उत्तर प्रदेशाच्या सहारनपूरमधील गुना या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारानंतर परिसरातील लोकांनी निषेध व्यक्त करत दिल्ली-यमुनोत्री महामार्गावर रास्तारोको केला आहे. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. या निदर्शनांमुळे सिद्धपीठ शाकंभरी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची वाहने ट्रॅफिक जाममध्ये अडकली आहेत.