जयहिंद मध्ये पार पडला फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम.

नारायणगाव- कुरण (ता. जुन्नर) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात एक दिवसीय फॅकल्टी डेव्हलमेंट प्रोग्राम पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जी. एस अनावकर हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित प्राध्यापकांना स्वयं : जागृती आणि विद्यार्थी-प्राध्यापक संबंधाबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमास कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस. गल्हे, संचालिका शुभांगी गुंजाळ, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्थापत्य विभागातील प्रा. जी. एस. सुपेकर यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.