गोंदिया: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धडाकाच सुरु केला असून महाराष्ट्रातील आपल्या दुसऱ्या जाहीर सभेत विरोधकांवर तुफान टीका केली आहे. आपण घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा निर्णयच घेतला असल्याचे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या योजनेचा भाग असल्याची टीका केली.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी पुन्हा एका राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पूर्वी युरिया खताचे आणि शेतकऱ्यांचे पैसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे जात असल्याचा आरोप मोदी यांनी केला. शहरी नक्षलवाद्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी घालत आहे, असे सांगत ‘तिहार’मधून गौप्यस्फोट होईल याच भीतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली असल्याची टीका मोदी यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना आजकाल झोप का नाही लागत?
कशाची भीती सतावते? ऐका मोदीजींच्या भाषणातून @NCPspeaks pic.twitter.com/bH8rMQ4fsN— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 4, 2019