आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाला अटक

नवी दिल्ली: कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये (केपीएल) मॅच फिक्‍सिंगप्रकरणी सेंट्रल क्राइम ब्रॅंचने आंतरराष्ट्रीय बुकी सय्याम याला अटक केली आहे. हरियाणात राहणाऱ्या सय्यामला ताब्यात घेण्यात आले आहे.

केपीएलमध्ये याआधी दोन क्रिकेटपटूंशिवाय तिघांना अटक केली आहे. कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या दोन खेळाडूंवर मॅच फिक्‍सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. यामध्ये बेल्लारीचा कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांचा समावेश आहे. 2019 च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्‍सिंग झाल्याचे सिद्ध झाले होते.

सीएम गौतम कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळला आहे. तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडूनही 2011 आणि 2012 साली सहभागी झाला होता. मात्र, त्याला अंतिम अकरा खेळाडूंत खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला मुंबई आणि दिल्ली संघातही घेतले होते.

मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संघी मिळाली नव्हती. काझी याआधी कर्नाटककडून तर सध्या मिझोरामकडून खेळतो. सय्यामच्या आधीही काही खेळाडू तसेच प्रशिक्षक यांना अटक झालेली आहे. बंगळुरू ब्लास्टर्सचे फलंदाजी प्रशिक्षक वीनू प्रसाद, सेलिब्रिटी ड्रमर भावेश बाफना यांनाही ताब्यात घेतले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here