गेली दोन ते तीन वर्षे भारतीय अर्थव्यवस्था व शेअर बाजार यामध्ये आलेली मरगळ अनेक कारणांमुळे निर्माण झालेली आहे. अशावेळी भारतीय गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करताना जागतिक पातळीवर निर्माण होणाऱ्या विविध संधी म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक पर्यायांमधून घेता येणे शक्य झाले आहे.
22 ऑक्टोबर 2018 रोजी ऍक्सिस म्युच्युअल फंडाने भारतीय गुंतवणूकदारांसाठी अक्सिस ग्रोथ अपॉर्च्युनिटी फंड बाजारात खुला केला. या फंडाचे मॅनेजर जिनेश गोपानी आहेत. या फंडाने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले आणि गुंतवणूकदारांना जवळपास 19 टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाच्या योजनेची रचना पुढीलप्रमाणे आहे.
65-70 टक्के गुंतवणूक भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या वेगाने वाढणाऱ्या उत्कृष्ठ व्यवसायांमध्ये गुंतवणूक व उर्वरीत 30-35 टक्के गुंतवणूक जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या सर्वोत्तम कंपन्यांमध्ये केलेली आहे. या प्रकारात भारतीय गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करत असताना जागतिक संधीचा फायदा मिळवत आहेत. भारताबरोबरच अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण अफ्रिका, चीन व जपान अशा विविध देशांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक उत्कृष्ठ कंपन्या व त्यांचा लाभ गुंतवणुकीतून मिळवणे शक्य झाले आहे.
अशा प्रकारे गुंतवणुकीचे जागतिक बाजारपेठेत विभाजन केल्यास जागतिकीकरणाचे विविध फायदे व संधी गुंतवणुकीच्या माध्यमातून घेता येतात. भारतात बहुतांश गुंतवणूकदार केवळ भारतीय बाजारपेठेतच गुंतवणूक संधी शोधत असतात व केवळ भारतीय उद्योगधंद्यातच गुंतवणूक करत असतात. परंतु जागतिक पातळीवर निर्माण होणाऱ्या गुंतवणकीच्या संधींचा फायदा गुंतवणूकदारांना असा मिळत आहे. केवळ एकाच बाजारपेठेत गुंतवणूक करणे जोखिम वाढवत असते.
भारतीय एकूण बाजारपेठेच्या आकाराच्या बरोबरीने अमेरिकेतील केवळ तीन कंपन्यांचे भांडवली आकारमान आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. भारत = ऍपल + मायक्रोसॉफ्ट + अमेझॉन जागतिक बाजारपेठेत केलेली गुंतवणूक अनेकवेळा अनेकपटींनी फायदेशीर संधी घेऊन येते. जागतिक पातळीवर अनेक बाजारपेठा विविध कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा परतावा देत आलेल्या आहेत.
वरील तक्त्यावरून असे निदर्शनास येते की, ज्या वर्षी भारतीय बाजारपेठेत नुकसान सहन केले त्यावेळी जागतिक पातळीवर इतर बाजारपेठांनी भारतापेक्षा चांगला परतावा दिला आहे. भारतीय बाजारपेठेतील गुंतवणुसोबतच जर अत्यंत चांगल्या व उत्कृष्ठ कंपन्यांमध्ये जागतिक पातळीवर गुंतवणूक केली असता गुंतवणुकीतील जोखिम बऱ्याच अंशी कमी होते व आपल्या गुंतवणुकीमधील परतावाही वाढतो.
मागील एक वर्षांचा आढावा घेतला तर अक्सिस ग्रोथ अपॉर्च्युनिटी फंडाने इतर भारतीय म्युच्युअल फंडाच्या (शंभर टक्के गुंतवणूक भारतीय बाजारपेठेत असणाऱ्या) योजनेपेक्षा अत्यंत फायदेशीर परतावा दिला आहे.