सारा अली खान आपल्या फिटनेसबाबत खूपच जागरुक आहे. जीमला जाणे ती कधीही चुकवत नाही. आपल्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी सोशल मिडीयावर अपलोडही करत असते. त्यामुळे तिच्या जीमच्या बाहेर अनेक व्हिडीओग्राफर्स तिची वाट बघत उभे असतात.
त्यांच्याबाबत तिला विचारले असता, माझे फोटो काढले तर मला त्रास होत नाही. उलट फोटो काढलेच नाहीत, तर मला त्रास होतो, असे उत्तर तिने दिले. एरवी या पापराजींकडून होणाऱ्या त्रासाला सगळेच स्टार वैतागतात. पण साराला आपली स्टारव्हॅल्यू वाढवण्यासाठी या पापराजींकडून जर काही त्रास झाला, तर तो हवाच असतो.
आपल्या या ऍटिट्युडबाबत इतर कोणाशी तुलना केल्याचेही तिला काही वाटत नाही. कारण फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन अगदी थोडे दिवस झाले असल्यामुळे आपल्या ऍटिट्युडची कोणाशी तुलना होऊ शकत नाही, असे ती म्हणाली.
सारा सध्या कार्तिक आर्यनबरोबर “लव्ह आज कल’च्या सिक्वेलमध्ये काम करते आहे. याशिवाय वरुण धवनबरोबर “कुली नं.1’च्या रिमेकमध्येही ती लीड रोल करते आहे.