युवक काँग्रेस आक्रमक; सुब्रह्मण्यम स्वामीची पोस्टर्स जाळली

कोल्हापूर – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका करणाऱ्या सुब्रह्मण्यम स्वामी यांचा आज कोल्हापुरात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर युवक काँग्रेसचे तौफिक मुल्लानी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी येथील दसरा चौकात सुब्रमण्यम स्वामी यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे पोस्टरही जाळण्यात आहे.

Posted by Digital Prabhat on Tuesday, 9 July 2019

चार दिवसांपूर्वी एका मासिकात सुब्रमण्यम स्वामी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. लेखात ते म्हणाले होते की, राहुल गांधी यांना अंमली पदार्थांचे व्यसन आहे. त्यांच्या या विधानानंतर देशभर संतापाची लाट उमटलीय. सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाची बदनामी झाल्याचा आरोप सुद्धा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

या आक्षेपार्ह विधानामुळे कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अपमानित वाटू लागल्याने आज कोल्हापुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत सुब्रमण्यम स्वामी यांचे पोस्टर जाळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)