ऑनलाइन बुकिंगसाठी पर्यटकांची मते विचारता येणार

एमटीडीसीच्या कारभारात आमूलाग्र बदल : पारदर्शकता येणार

पुणे – गेल्या काही वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने म्हणजेच एमटीडीसीने आपल्या कारभारात आमूलाग्र बदल केला आहे. त्यामुळे पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळत आहे. त्यातूनच महामंडळाकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ लागले आहेत, ही बाब लक्षात घेऊन या कारभारात आणखी सुधारणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून यापुढील कालावधीत सर्व प्रकारचे बुकिंग ऑनलाईन सुरु करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी पर्यटकांची मते विचारता येणार आहेत. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत पर्यटनाला चांगलेच महत्व आले आहे. हे वास्तव असले तरीही खासगी हॉटेलच्या वाढीव दरामुळे पर्यटक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत, त्यामुळे याची दखल घेऊन पर्यटकांना वाजवी दरात चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे त्याला अपेक्षेपेक्षाही अधिक यश आले आहे, त्यामुळेच महामंडळाला सुट्टयांच्या आधी दोन ते तीन महिने बुकिंग सुरु करावे लागत आहे. विशेष म्हणजे अवघ्या आठ ते पंधरा दिवसांच्या आत हे बुकिंग फुल्ल होत आहे. त्यामुळे महामंडळाच्या कारभाराचा दर्जा सुधारल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यटकांना त्याच दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाच्या वतीने खासगी ठेकेदारांना निवास आणि न्याहारी केंद्राचे ठेके देण्यात आले आहेत, त्यातूनच स्थानिक बेरोजगारांना रोजगारही मिळाले आहेत. विशेष म्हणजे या केंद्राचा दर्जा चांगला असल्याने आणि महामंडळाचा या केंद्रावर वॉच असल्याने त्यांनाही पर्यटकांची पसंती मिळत आहे.

त्यातूनच आगामी काळात या बुकिंगवरुन वाद होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, ही बाब लक्षात घेऊन या कारभारात आणखी पारदर्शकता आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार पर्यटनाचे बुकिंग ऑनलाईन करण्याचा महामंडळ गांभीर्याने विचार करत आहे. त्यानुसार त्याचा आराखडा महामंडळाच्या वतीने तयार करण्यात आला आहे, हे वास्तव असले तरी त्यासंदर्भात महामंडळाच्या वतीने पर्यटकांची मते जाणून घेण्यात येणार असून त्याची प्रक्रिया येत्या काही दिवसातच सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)