#व्हिडीओ : रिंगणी अश्‍व चौफेर धावला

संग्रहित छायाचित्र.......

– विनोद गोलांडे

सोमेश्‍वरनगर – ज्ञानोबा-तुकारामांचा गजर… त्याला टाळ मृदंगाची सुरेल साथ… हवेत उंच झेपावणाऱ्या भगव्या पताका… भक्तीरसात चिंब झालेले वारकरी… अशा भक्तिमय वातावरणाच्या परमोच्च क्षणाला सोपानकाकांच्या पालखीचा अश्‍व चौफेर धावला अन्‌ उपस्थितांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटिले.

संत सोपानकाकांच्या पालखीचे पहिले अश्‍वरिंगण वाघळवाडी-सोमेश्‍वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडले. सोमवारी (दि. 1) पुरंदर तालुक्‍याचा निरोप घेत सोपानकाकांच्या पालखीने बारामती तालुक्‍यात प्रवेश केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)