पावसाळ्यातही मेंटेन करा तुमचा ट्रेंडी लूक!

जगभरामध्ये आपल्या भारत देशाची ओळख वैविध्यतेने नटलेला देश अशी आहे. अशा या विविध रंगानी नटलेल्या देशामधील लोकांच्या पोषाखामध्ये देखील वैविध्यता असल्याचे आढळते. आपल्या देशातील लोक प्रामुख्याने परंपरेनुसार आपला पोशाख निवडताना दिसत असले तरी सध्याच्या नव्या जमान्यातील तरुण पिढी सीजननुसार कपडे निवडताना दिसत आहे. आणि त्यातच आता उन्हाळा सरला असून सर्वत्र रेनी सीझनचे आगमन झाले असल्याने रेनी सीझनमधील कपडे आणि ऍक्‍सेसरीज बाबत भलतीच क्रेझ निर्माण झाली आहे.

पूर्वी पावसाळा आला की आपल्याकडे एकच काळ्या रंगाची छत्री असायची. भली मोठी छत्री घेतली की एक-दोन माणसे त्याचातून आरामात पावसापासून आपला बचाव करत चालू शकायची. छत्री म्हणजे पावसापासून संरक्षण इतकाच काय तो त्याचा उपयोग. फार तर फार मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी रेनकोट. तेही लहानांसाठी छानशी व्हरायटी पण मोठ्यांसाठी मात्र विविधतेने नटलेले रेनकोट मिळणे मुश्‍किलच. पण आता मात्र भरपूर ट्रेंडी आणि व्हरायटी असणाऱ्या पावसाळी ऍक्‍सेसरीज युवा पिढीसाठी उपलब्ध झाल्या असून रेनकोट, छत्र्या, जॅकेट, स्लीपर्स, क्रॉक्‍स शूज, पावसाळी कपडे इत्यादी ऍक्‍सेसरीज वेगवेळ्या रंगात व ढंगात बाजारात उपलब्ध आहेत. या पावसाळी ऍक्‍सेसरीजची निर्मिती तरुणांमध्ये ट्रेंडी लुकबाबत असणारी क्रेझ लक्षात घेऊन करण्यात आल्याने या ऍक्‍सेसरीजला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रेनी ऍक्‍सेसरीज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुकानात जाण्याची गरज नसून विविध ई-कॉमर्स साईटवर या ऍक्‍सेसरीज खिशाला परवडतील अशा किमतींमध्ये उपलब्ध आहेत.

पावसाळा आला की ट्रॅव्हलिंग किंवा ऑफिससाठी कोणता लुक कॅरी करावा याबाबत चिंता लागून राहते. मात्र, आता पावसाळ्यातील ट्रेंडी ऍक्‍सेसरीज यावर चांगला पर्याय ठरताना दिसत असून गर्ल्ससाठी ट्रेंडी प्लाझो, ब्लु-डेनिम, अँकल- लेंथ, फ्लोरा प्रिंट शर्ट आणि लोफर असे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. तर बॉईजसाठी कॉटन पॅन्ट (शॉर्टस), लिनन शर्ट, स्लिपर्स, सॅंडल असे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. या पावसाळ्यात तुम्ही आपला हटके लुक नक्कीच मेंटेन करू शकाल.

– ऋषिकेश जंगम

Leave A Reply

Your email address will not be published.