खाशोगी हत्येशी संबंधीत 16 सौदी नागरीकांवर अमेरिकेची बंदी

वॉशिंग्टन – पत्रकार जमाल खाशोगी हत्या प्रकरणात ज्या 16 सौदी नागरीकांवर संशय आहे त्या नागरीकांना अमेरिकेने आपल्या देशात प्रवेश बंदी लागू केली आहे. पत्रकार व लेखक खाशोगी यांची गेल्या वर्षी इस्तानबुल येथे 2 ऑक्‍टोबर रोजी हत्या झाली होती. सौदीतील सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर ही हत्या झाल्याचा आरोप असून या प्रकरणी ट्रम्प प्रशासनाने अत्यंत हलगर्जीपणा केल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या सिनेटने या हत्येला सौदीचे क्राऊन प्रिंस मोहंमद बिन सलमान हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे, पण ट्रम्प यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही यावरून ट्रम्प प्रशासनावर विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे. सौदी अरेबिया हा अमेरिकेचा मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश असून इराण विरोधीतील संघर्षात तो अमेरिकेचा जवळचा मित्र असल्याची भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. आज अमेरिकेने सौदीतील ज्या नागरीकांना अमेरिका प्रवेशाची बंदी घातली आहे त्यात सौदीच्या विदेश मंत्रालयासह अन्य सरकारी विभागाचे अधिकारी आहेत. हे अधिकारी आणि त्यांचे कुटुंबिय यांना अमेरिका प्रवेशाची बंदी लागू राहणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)