दिल्ली : डॉ. हर्षवर्धन यांचा उमेदवारी अर्ज दाखल; रॅलीत नितीन गडकरींची उपस्थिती

दिल्ली – भाजपने दिल्लीच्या चार मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. चारही जागेवर विद्यमान खासदारांना परत एकदा संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपने चांदनी चौक येथून डॉ. हर्षवर्धन, उत्तर पूर्व दिल्लीमधून मनोज तिवारी, पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा आणि दक्षिण दिल्लीतून रमेश बिधूंडी यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

सोमवारी चांदनी चौक येथील भाजपचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन यांनी भव्य रोड शो काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. खुद्द नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेली कामे आणि जनेतचा त्यांच्या प्रती असलेला लगाव पाहता मला खात्री आहे की, मागील निवडणुकीत मिळालेल्या मतापेक्षा अधिक मतानी ते विजय होतील.”

चांदनी चौक येथून डॉ. हर्षवर्धन यांना काँग्रेसचे उमेदवार जयप्रकाश अग्रवाल आणि आम आदमी पक्षाचे पंकज गुप्ता याचं आव्हान असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)