आयपीएलचा अंतिम सामना रंगणार हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेटचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या आयपीएल या बहुप्रतीक्षित स्पर्धेची फाइनल १२ मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळली जाणार आहे. तर चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे अंतिम सामन्यातील पात्रता फेरीसाठी सामने होणार आहेत.

आयपीएल या बहुप्रतीक्षित स्पर्धेला २३ मार्चपासून सुरुवात झालेली आहे. यंदाच्या आयपीएलच्या १२ व्या हंगामाची अंतिम फेरी हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज मुख्य दावेदार –

चेन्नई सुपर किंग्ज या संघाला आयपीएलमधील सर्वात बलाढ्य संघ समजले जाते. या संघाने आतापर्यंत २०१०, २०११ आणि २०१८ अशा तीन वेळा आयपीएलची ट्रॉफी पटकावली असून यंदा पुन्हा एकदा चौथ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या अपेक्षेने चेन्नईचा संघ मैदानात उतरताना दिसत आहे.

 

 

.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.