दोन्ही महिला पोलीस उपायुक्‍तांच्या बदल्या

स्मिता पाटील, सुधीर हिरेमठ नवे उपायुक्‍त 
पिंपरी  –
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील परिमंडळ 1 आणि परिमंडळ 2 मधील दोन्ही महिला पोलीस उपायुक्‍तांची बदली झाली आहे. राज्यातील एकूण 52 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आज राज्य शासनाच्या गृहविभागाने काढले आहेत. त्यात स्मार्तना पाटील आणि नम्रता पाटील या दोन्ही पोलीस उपायुक्‍तांची बदली करण्यात आली आहे. राज्य व भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्‍त (असंवर्ग) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश आज काढण्यात आले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या परिमंडळ एक पोलीस उपायुक्‍तपदी स्मिता अभिषेक पाटील व परिमंडळ दोन पोलीस उपायुक्‍तपदी सुधीर हिरेमठ यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या स्थापनेनंतर आयुक्‍तालयांतर्गत दोन परिमंडळ निर्माण करण्यात आले. स्थापनेपासून दोन्ही परिमंडळांसाठी महिला पोलीस उपायुक्‍त म्हणून स्मार्तना पाटील व नम्रता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी (दि. 15) राज्यातील विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

त्यात स्मार्तना पाटील यांची ठाणे शहरच्या विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्‍तपदी तर नम्रता पाटील यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, सागरी परिक्षेत्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता अभिषेक पाटील यांची पिंपरी-चिंचवडच्या परिमंडळ एक पोलीस उपायुक्तपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर सहायक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय), राज्य पोलीस मुख्यालय, मुंबई येथे कार्यरत असलेले सुधीर हिरेमठ यांची परिमंडळ दोन पोलीस उपायुक्तपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)