गाव तेथे शिवसेना शाखा काढणार : यशवंत घाडगे

कोरेगाव – शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. सामान्य जनतेच्या प्रश्‍नांसाठी अहोरात्र लढणार्या शिवसैनिकांच्या माध्यमातून गाव तेथे शिवसेना शाखा काढणार आहे. तरुणांना भगव्या झेंड्याखाली एकत्रित करणार असून, सातारा जिल्हा हा शिवसेनेचा अभेध किल्ला राहील, अशी वाटचाल राहणार आहे, अशी माहिती नवनियुक्त जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कोरेगावात झाली. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत माहिती दिली. उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, कोरेगाव तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर, सातारा तालुकाप्रमुख दत्तात्रय नलावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

घाडगे पुढे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात पक्षाची नव्याने बांधणी हाती घेण्यात आली आहे. माझ्याकडे सातारा-जावळी, कोरेगाव आणि वाई विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेची भम ताकद आहे, मात्र भगवामय महाराष्ट्र करण्यासाठी आणि तरुण पिढी जास्तीत जास्त संख्येने शिवसेनेत सहभागी व्हावे असे आवाहन घाडगे यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here