अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार पेचप्रसंगावर पुन्हा सुरू होणार बोलणी

बिजींग – अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे दोन्ही देशांतील आयात-निर्यातदारांना मोठा फटका बसला असून त्यातून जगातल्या अन्य देशांच्या अर्थकारणावरही विपरीत परिणाम होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या विषयावर दोन्ही देशांन आता पुन्हा एकमेकांशी चर्चा करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे अशी माहिती चीन सरकारच्या अधिकृत माध्यमाने दिली आहे.

दरम्यान चीनहुन आयात केल्या जाणाऱ्या मालावर पुन्हा नव्याने करवाढ करायची नाही असाही निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेने चिनी मालावर मोठ्या प्रमाणात कर लागू केल्याने चिनच्या निर्यातीवर प्रचंड विपरीत परिणाम झाला असून त्यामुळे चिनी अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत लोटली गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देश एकमेकांशी पुन्हा चर्चा करण्यास राजी झाले आहेत.

चीन विषयी आमची आकसाची भूमिका नाही दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध राहावेत अशी आमची भूमिका आहे असेही अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे त्यामुळे या परस्पर स्पर्धक देशांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका आणि चीन या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. त्यांनी एकमेकांच्या मालावर मोठ्या प्रमाणात कर लागू केल्याने अर्थकारणाचे चक्र उलटे फिरताना दिसून येत आहे.

ट्रम्प यांनी 250 अब्ज डॉर्लसच्या चिनी मालावर तब्बल 25 टक्के कर लागू केला आहे. त्यातूनही चीन बधला नाही तर चीनच्या आणखी 300 अब्ज डॉलर्सच्या मालावर 30 टक्के जादा कर लागू करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here