पुणे – शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला साधारण तीन महिन्यापुर्वी आग लागुन २०० पेक्षा अधिक घरं जळुन खाक झाली होती. या घटनेतून तेथील नागरिक सावरत असतानाच पुन्हा एकदा झोपडपट्टीतील काही घरांना आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
माहितीनुसार, पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळामध्ये नऊ गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.