भामिदिप्ती, रयुही अझूमा यांचे मानांकित खेळाडूंवर विजय

गद्रे मरिन-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे  – डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणिपुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरिन एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत मुलींच्या गटात भारताच्या श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती, सालसा आहेर, थायलंडच्या पिमरादा जट्टावापोर्नवीत यांनी तर, मुलांच्या गटात जपानच्या रयुही अझूमा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात भारताच्या श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत अव्वल मानांकित शिवानी अमिनेनीचा टायब्रेकमध्ये 6-0, 7-6(1)असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. थायलंडच्या पाचव्या मानांकित पिमरादा जट्टावापोर्नवीतने तिसऱ्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या मातीलदा मुटावडेझीकचा 6-4, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

उपांत्य फेरीत श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती समोर पिमरादा जट्टावापोर्नवीतचे आव्हान असणार आहे. सहाव्या मानांकित भारताच्या सालसा आहेर हिने जपानच्या चौथ्या मानांकित कोहरू निमीचा 6-4, 6-4असा पराभव केला. जपानच्या इरीका मतसुदा हिने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या संदिप्ती सिंग रावचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

मुलांच्या गटात अव्वल मानांकित भारताच्या सिद्धांत बांठिया याने पोलंडच्या सहाव्या मानांकित पीटर पावलकचा 6-4, 6-1असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकित जपानच्या रयुही अझूमा याने भारताच्या तिसऱ्या मानांकित सच्चीत शर्माचा टायब्रेकमध्ये 7-6(0), 6-4असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : एकेरी गट : मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी): मुले :

सिद्धांत बांठिया(भारत)(1)वि.वि.पीटर पावलक(पोलंड)(6)6-4, 6-1;
रयुही अझूमा(जपान)(7)वि.वि.सच्चीत शर्मा(भारत)(3) 7-6(0), 6-4;
कसीदीत समरेज(थायलंड)(4)वि.वि.देव जाविया(भारत)(5)7-5, 6-4;
मन शहा(भारत)(2)वि.वि.सुशांत दबस(भारत) 7-6(5), 6-3;

मुली:

श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती(भारत)वि.वि.शिवानी अमिनेनी(भारत)(1) 6-0, 7-6(1);
पिमरादा जट्टावापोर्नवीत(थायलंड)(5)वि.वि.मातीलदा मुटावडेझीक(ग्रेट ब्रिटन)(3) 6-4, 6-4;
सालसा आहेर(भारत)(6)वि.वि.कोहरू निमी(जपान)(4)6-4, 6-4;
इरीका मतसुदा(जपान)वि.वि.संदिप्ती सिंग राव(भारत) 6-3, 6-2;

दुहेरी गट: मुले: उपांत्य फेरी:

देव जाविया/मन शहा(भारत)वि.वि.रोमेन फौकोन/पीटर पावलक(पोलंड)4 7-5, 6-4
कसीदीत समरेज(थायलंड)/सच्चीत शर्मा(भारत)वि.वि.सिद्धांत बांठिया(भारत)/मधवीन कामत(भारत)3 6-4, 6-3

मुली:

ली यु-युन/कोहरू निमी(जपान)3वि.वि.मातीलदा मुटावडेझीक(ग्रेट ब्रिटन)/इरीन रिचर्डसन(ग्रेट ब्रिटन)1 4-6 7-6(5) 11-9
सालसा आहेर(भारत)/इरीका मतसुदा(जपान)4वि.वि.मई हसिगावा(जपान)/मल्लिका मराठे(भारत)6-3 7-5


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)