“सुपर 30′ चित्रपट 12 जुलैला होणार प्रदर्शित

अनेक अडचणींना पुढे जात ‘सुपर 30′ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाटणातील जगप्रसिद्ध गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित बायॉपिक “सुपर 30′ सध्या अडचणीतून बाहेर येताना दिसत  आहे. हृतिकचा हा सिनेमा येत्या 26 जुलैला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट १२ जुलै प्रदर्शित होणार आहे.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ‘सुपर 30’ च्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली.  ‘सुपर 30’ च्या प्रदर्शनाची तारिख ठरली. १२ जुलै २०१९, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. अर्थात १२ जुलै या नव्या तारखेलाही एकता कपूरचा आणखी एक सिनेमा रिलीज होतोय. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा स्टारर ‘जबरिया जोडी’हा सिनेमाही १२ जुलैला रिलीज होतोय. पण यावेळी एकता कपूर एक पाऊल मागे घेत, ‘जबरिया जोडी’ची रिलीज डेट बदलवू शकते. शेवटी एकता हृतिकची चांगली मैत्रिण आहे. अशात दुसºयांदा हृतिकला दुखावणे कदाचित तिला शक्य होणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)